Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर मेट्रोमधील अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. कधी कोणी भांडताना दिसते, कधी मारामारी करताना दिसते, कधी स्टंट करताना दिसतात तर कधी नाचताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एक महिलेला बसण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून वाद घालताना दिसते आणि जागा मिळवण्यासाठी महिला असे काही करते जे पाहून लोकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
स्त्री -पुरुष समानतेवर नेहमी चर्चा होत असते. स्त्रियांना कुठेही असमान किंवा चुकीची वागणुक दिली जाते तेव्हा त्या विरोधात आवाज उठवला जातो पण, अनेकदा पुरुषांबरोबरही असे प्रकार घडतात पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. असाचा काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – हीच आपली संस्कृती! गावोगावी भटकंती करणाऱ्या सुंदर नंदीबैलाचा Video होतोय व्हायरल
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, गर्दीने खचाखच भरलेल्या दिल्ली मेट्रोमध्ये एक महिला जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी मेट्रोमध्ये सीटवर बसलेल्या पुरुषांना तिने उठवण्यासाठी वाद घातला. जेव्हा त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तेव्हा ती महिला थेट त्या तरुणाच्या पायावर बसली. हा धक्कादायक प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती महिला बसण्यासाठी मेट्रोमध्ये सीटवर बसलेल्या तरुणाला त्रास देत आहे. त्यानंतर ती महिला असेही म्हणते की, “ काही हरकत नाही मग आम्ही देखील निर्लज्ज होणार’.’ हे पाहून शेजारील पुरुष अस्वस्थ होतो आणि आपली जागा सोडून तेथून उठतो. तरीही ती महिला तरुणाच्या पायावर बसून राहते. ही महिला जनरल डब्यातून प्रवास करत असूनही जागेसाठी अशी वर्तणूक करत आहे हे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – कपडे इस्त्री करण्यासाठी महिलेने वापरला प्रेशर कुकर; जुगाड पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले……
“या बाईने एका जागेसाठी मुलाला उठायला सांगितले. जेव्हा त्याने शांतपणे नकार दिला तेव्हा ती जबरदस्तीने त्याच्या पायावर बसली. मला आठवते, मागच्या वेळी एका पुरुषाने केले तेव्हा याला गैरवर्तन म्हटले होते” असे एक्सवर एकाने लिहिले.
“मला काही स्त्रियांचे हे वागणे खरोखरच आवडत नाही …जेव्हा ते असे भासवतात की, त्यांना पुरुषांपेक्षा अधिक आदर आणि काळजीने वागवले पाहिजे….बहुतेक मुले स्वतःहून स्त्रियांना जागा देतात आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यात काही गैर नाही. असे मत दुसऱ्याने व्यक्त केले.