लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत. त्यामुळे अशा नराधमांपासून तरुणींने स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी त्यांना कराटे आणि बचावासाठी प्रशिक्षण देण्यात येतं आहे. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दिल्लीतील साहिल साक्षी हत्याकांड ताजं असतानाच रोज मुलींसोबतच्या आत्याचाराच्या अनेक घटना आपण आजही एकत असतो. अशातच कर्नाटकमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण बसमध्ये तरुणीची छेड काढत होता. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचाही त्याने प्रयत्न केला. तरुणीने सुरुवातीला त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिने इशाऱ्यातून त्याला तंबी दिली. पण तरी तरुण काही थांबला नाही. अखेर तरुणीला राग अनावर झाला. संतप्त तरुणीने त्या तरुणाला चोपायलाच सुरुवात केली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: मगर निघाली शाळेला! काही क्षणातच रेस्क्यू टीमनं धाडलं जंगलात, थरारक दृश्य व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतप्त झाले असून, अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत. अनेक लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. कोणी या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय. तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हंटलंय.