चीनमध्ये नऊ मजल्यांच्या इमारतीवरून दोनदा पडूनही एक महिला सुखरूप बचावली. ही महिला हॉटेलमध्ये राहायला आली असल्याचं समजते. हॉटेलच्या गच्चीवरून ती खाली पडली पण, सुदैवानं ती रस्त्यावर न पडता दुसऱ्या मजल्यावर पडली. तो प्रकार रस्त्यावरच्या लोकांनी पाहिला आणि हॉटेलच्या गेटवर बघ्यांची गर्दी जमली. ही महिला उठून उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला आणि दुसऱ्या मजल्यावरून ती पुन्हा खाली कोसळली. सुदैवानं बिल्डिंगच्या खाली जमलेल्या बघ्यांनी या महिलेला झेललं. या महिलेनं आत्महत्या केली की, ती कोसळली हे समजू शकलं नाही.
रस्त्यावर असणाऱ्या बघ्यांनी हे दृश्य कॅमेरात कैद केलं. मृत्यूला हुलकावणी देऊन ती वाचली खरी पण, यात ती गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.