wife takes husband to police station : तरुणी असो किंवा महिला प्रत्येकाला खरेदी (शॉपिंग) करायला प्रचंड आवडते; मग ती विंडो शॉपिंग असो किंवा आणखीन काही… एखादा नवीन सण असो किंवा कुणाच्या लग्नाला जायचं असो, आपल्या प्रत्येकाला नवीन कपडे खरेदी करण्याचं एक वेगळंच वेड असतं. अशातच लग्न झालेल्या स्त्रियांचा हट्ट असतो की, मला नवऱ्याने साडी खरेदी करून द्यावी. तर आज याच संबंधित एक मजेशीर घटना समोर आली आहे. नवऱ्याने बायकोला साडी न दिल्यामुळे तिने थेट त्याची तक्रार केली आहे. नक्की काय घडलं? यातून नक्की काय उपाय काढला, चला लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ही घटना घडली आहे. एका जोडप्याचं अनोखंच प्रकरण समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या विवाहित जोडप्याचे २०२२ साली लग्न झाले होते. लग्न झालेल्या जोडप्याचे क्षुल्लक मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत असत. एकदा बायकोला नवीन साडी हवी होती. तिने नवऱ्याकडे नवीन साडीची मागणी केली. पण, त्यांच्यात या कारणावरून प्रचंड वाद झाला. तिने तिच्या समस्या कुटुंब समुपदेशन केंद्र (फॅमिली काउन्सलिंग सेंटर ) मध्ये सांगितल्या.

crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
The woman attacked for refusing to marry in thane
विवाह करण्यास नकार दिल्याने महिलेने केला गुप्तांगावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
Erandwane koyta attack pune marathi news
पुणे: पोलिसांकडे तक्रार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, एरंडवणे भागातील घटना
Vasai Crime News
Vasai Crime : मालकाने पगार न दिल्याने तीन तरुणींचे अजब कृत्य, पाण्याच्या बाटलीतून लघुशंका प्यायला दिल्याचा रचला बनाव

हेही वाचा…निस्वार्थ प्रेम! आनंदाने आईस्क्रीम खाणाऱ्या मुलाला पाहून बाबांनी काढला फोटो; VIRAL VIDEO ‘तो’ एक क्षण पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

फॅमिली काउन्सलिंग सेंटरमध्ये जाऊन तिने तक्रार दाखल केली. तसेच दावा केला की, तिचा नवरा शारीरिकरित्या हिंसक होता. रात्री उशिरा विचित्र फोन कॉल केल्याचाही आरोप लावला. हे सर्व ऐकून फॅमिली काउन्सलिंग सेंटरने दोघांमध्ये मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. नवऱ्याने आपल्या पत्नीच्या मागण्या मान्य केल्या आणि तिला हवी असलेली साडी विकत दिली आणि हा या गोष्टीचा टर्निंग पॉइंट ठरला. नवऱ्याने साडीसाठी सहमती दर्शविल्यानंतर जोडपं केंद्रातून निघून आले.

याआधी आग्रा येथील आणखी एका महिलेने नवऱ्याकडून कुरकुरेचे पॅकेट न मिळाल्याने घटस्फोटाची मागणी केली. काही तरी चटपटीत खाण्याच्या इच्छा वह्यांची म्हणून ती नवऱ्याला पाच रुपये कुरकुरे आणण्यास सांगायची. पण, एके दिवशी नवरा आपल्या बायकोसाठी कुरकुरे आणायला विसरला. त्यानंतर ती घर सोडून तिच्या पालकांच्या घरी गेली. नंतर तिने पोलिसांकडे जाऊन घटस्फोट मागितला.अशाप्रकारे या प्रकरणाचा शेवट झाला.