Viral Video : कुत्रा आणि माणसाचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. कुत्र्याला माणसाचा अतिशय जवळचा मित्र मानला जातो. कोणत्याही कठीण प्रसंगी कुत्रा हा माणसाच्या नेहमी बरोबर राहतो आणि मदतीला धावून येतो. अनेक व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेल की कुत्र्याने माणसाचा जीव वाचवला आहे. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल की एक महिला कुत्र्याचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की महिला अतिशय हुशारीने कुत्र्याचा जीव वाचवते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a woman tried unique jugaad to save dogs life video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भन्नाट जुगाड वापरून वाचवला कुत्र्याचा जीव

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक कुत्रा इमारतीच्या तिसऱ्या मजलीवरील एका खिडकीत अडकला आहे. थोडा जरी तोल गेला तरी कुत्रा इमारतीवरून खाली पडू शकतो. अशात या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एक महिला या कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की महिला हातात कागदी खोका पकडून खिडकीत उभी राहते आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कुत्र्याला या खोक्यात उडी मारायला सांगते. कुत्रा त्या महिलेचं ऐकतो आणि खोक्यात उडी मारतो. त्यानंतर महिला कुत्र्याला खोक्यातून बाहेर काढते. अशाप्रकारे अतिशय हुशारीने महिला कुत्र्याचा जीव वाचवते. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

rajputroyal_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माणुसकी माणसाला माणूस बनवते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच या धाडसी महिलेसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “देव तुम्हाला सर्व आनंद देवो” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणुसकी आजही जिवंत आहे” एक युजर लिहितो, “मन जिंकले ताई” अनेक युजर्सनी या महिलेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.