Viral Video : सध्या महाराष्ट्रात आषाढीची वारी सुरू आहे. वारकरी आणि विठ्ठल भक्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. भक्तांची ही वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाईन. काही वारकरी वारीमध्ये विठ्ठलाचे नामस्मरण करताना दिसत आहे तर काही भजन किर्तन करताना दिसत आहे. प्रत्येक दिवशी एका ठराविक गावात किंवा शहरात विसावा घेत ते पुढे जात आहे.

सोशल मीडियावर वारीतील अनेक व्हिडीओ समोर येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विश्रांती घेत असलेल्या एका महिलेला झोपेतून उठताच समोर विठू माऊली दिसली. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

झोपेतून उठताच समोर विठूमाऊली दिसली, अन्…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही वारीतील महिला विश्रांती घेत आहे. काही महिला बसलेल्या आहेत तर काही महिला झोपलेल्या आहेत. तेव्हा तिथे विठ्ठलाच्या वेशभूषेत एक तरुण येतो आणि एका गाढ झोपी गेलेल्या महिलेला हळूच उठवतो. झोपेतून उठताच समोर विठू माऊली पाहून महिला अवाक् होते आणि थेट विठ्ठलाचे पाय पकडते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : तो निवांत बसला होता पण एका कृतीनं होत्याचं नव्हतं झालं; बसमध्ये तुम्हीही ‘असे’ करता का? थरारक VIDEO पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “याला म्हणतात खरा फिटनेस!” न थांबता फक्त ६० सेकंदात मारले २५ पुल-अप्स’, ५६ वर्षांच्या मेजर जनरल यांचा Video Viral

santhanchi__wari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा !!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावनेवरून दिसून येते की मनातील श्रद्धा किती गाढ आहे….!” तर एका युजरने लिहिलेय, “डोळ्यात पाणी आलं….ज्याला आपण पुजतो न..तो बाप जर समोर दिसला तर….काय होतं खरंच शब्दात नाही सांगता येणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोणाच्या रुपात कोण येईल सांगता येत नाही” एक युजर लिहितो, “आज पर्यंत पहिल्याला सगळ्यात छान व्हिडिओ त्या मातेला वाटलं खरंच मला विठ्ठलाचे दर्शन झाला आहे.” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावूक झाले.