Viral Photo : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या प्रत्येकाकडे फोन असल्यामुळे दरदिवशी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी कोणी विचित्र डान्स करताना दिसतात तर कधी कोणी विचित्र वागताना दिसतात. काही गोष्टी पाहून संताप येतो तर काही गोष्टी पाहून चेहऱ्यावर हसू येते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही पोट धरून हसायला येईल.
या फोटोमध्ये एका महिलेचे पोस्टर दिसत आहे. या पोस्टरमध्ये ही महिला डोळे फाडून बघताना दिसत आहे. हे पोस्टर कोणाचेही लक्ष वेधून घेईल. बंगळूरूच्या एका भाजीपाल्याच्या गाड्यावर ही हे पोस्टर लावले होते. युजरने त्या पोस्टरचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर युजर्स या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसले. (a woman Weird photo at vegetable shop in Bangalore)
भाजीपाल्याच्या गाड्यावर दिसला हा फोटो
बंगळूरूमध्ये राहणाऱ्या निहारिका नावाच्या युजरने या पोस्टरचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. तिने तीन वेगवेगळे फोटो शेअर केले. फोटोमध्ये भाजीपाला विक्रेत्याचा गाडा दिसत आहे आणि गाड्यासमोर एका महिलेचे पोस्टर लावले आहे. हे पो्स्टर झाडाला लटकलेले आहे. फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की महिला डोळे फाडून रागाने बघत आहे. फोटोच्या समोर टोमॅटोचा गाडा दिसत आहे. फोटो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा फोटो पाहून कोणालाही प्रश्न पडेल की असा फोटो का लावला आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये निहारिका लिहिते, “मी खूप आनंदी आहे की मी आज घराबाहेर फिरायला आली”
हेही वाचा : काळजात धडकी भरवणारा अपघात! बाईकवरून तिघे सुस्साट आले अन् डिव्हायडरला धडक देत थेट…; थरकाप उडवणारा VIDEO
पाहा फोटो
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “टोमॅटोच्या सुरक्षेसाठी हे पोस्टर लावले आहे का? तर एका युजरने हे फोटो पाहून लिहिलेय, “हे फोटो अनेक दुकानांमध्ये लावले आहे.” एका युजरने लिहिलेय, “अशी प्रतिक्रिया कंपनीचे मॅनेजर देतात जेव्हा आपण पगार वाढीची गोष्ट करतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “जे लोक भाव कमी करण्यास सांगतात, त्यांना घाबरवण्यास हे पोस्टर लावले आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.