मातृत्व हा प्रत्येक महिलेसाठी एक खास अनुभव असतो. हा नऊ महिन्यांचा काळ तिच्यासाठी आव्हानात्मक तर असतोच पण तितकाच आनंद देणाराही असतो. पण समजा, एखाद्या महिलेला बाळ जन्मण्याच्या काही तासांपूर्वीच कळले की ती आई होणार आहे तर? असे होऊ शकते का? तुम्हाला ही मस्करी वाटू शकते, पण असेच एक प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेतील नेब्रास्का या शहरात ही घटना घडली आहे. येथील एका महिलेला बाळाच्या जन्माच्या ४८ तासांपूर्वीच समजले की ती गर्भवती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, पेशाने शिक्षिका असणाऱ्या २३ वर्षीय पेटन स्टोवर या महिलेला गर्भधारणेची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. एक दिवस अचानक तिला थकवा जाणवू लागला. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. तिला असे वाटले की नोकरीच्या ताणामुळे थकवा येत असावा.

यानंतर पायांमध्ये सूज येत असल्यामुळे पेटन डॉक्टरांकडे गेली. तेव्हा तिला समजले की ती आई होणार आहे. तिने सांगितले की, डॉक्टरांनी दोन गर्भधारणेच्या चाचण्यांनंतर सांगितले की ती आई होणार आहे. यानंतरही तिचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. म्हणून तिचे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. पेटन म्हणाली, ‘जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं, तेव्हाच मला खात्री पटली की मी गर्भवती आहे.’

फटाक्याची वात पेटवून पळताना भाजपाचा आमदार तोंडावरच पडला; Video Viral

मात्र, पेटनची किडनी आणि यकृत नीट काम करत नसल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिचा रक्तदाब खूपच वाढला होता. म्हणूनच शस्त्रक्रिया करून बाळाला ताबडतोब बाहेर काढावे लागेल असे डॉक्टरांनी तिला सांगितले. अशाप्रकारे १० आठवड्याआधीच पेटनच्या बाळाचा जन्म झाला. यावेळी बाळाचे वजन ८०० ग्राम होते.