सोशल मीडियावर दररोज हजारो फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, यापैकी ठरावीक फोटो किंवा व्हिडीओ असे असतात, जे नेटकऱ्यांना भावतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांनी या फोटोतील महिलेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर अनेकांनी हीच खरी माणुसकी आहे, असं म्हटलं आहे.

खरं तर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे देशातील बहुतांश भागातील लोक उष्माघाताच्या समस्येचा सामना करत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक लोक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी घराबाहेर जाताना आपलं संपुर्ण शरीर झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कोणी छत्री घेऊन, तर कोणी टोपी घालून उन्हाच्या झळांपासून आपलं संरक्षण करताना दिसत आहे. याच कडाक्याच्या उन्हात मनाला आपुलकीचा गारवा देणारा एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
Viral video Cars, trucks in air after hitting Gurugram speed bump
स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्यात, पाहा Viral Video
Accident Viral Video
प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?

हेही पाहा- “पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे…” ५८ लाखांच पॅकेज तरीही नाही समाधान, सॉफ्टवेअर इंजिनीअरने लिहिलेली ‘ती’ हृदयस्पर्शी पोस्ट Viral

या फोटोत, भर उन्हात तीन चाकी सायकल रिक्षामधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षाचालकाचे उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून स्वत:ची छत्री रिक्षाचालकाच्या डोक्यावर धरत त्याचा उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय या महिलेलाही उन्हाचा त्रास होत आहे पण रिक्षाचालकाला तो त्रास होऊ नये याची खबरदारी ती घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरजवळील कलाआम चौकातील आहे. तर ही महिला शिक्षिका असल्याचं सांगण्यात येत आहे. तर Journalist Shah Nawaz नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिलं आहे की, सुखदायक चित्र रखरखत्या उन्हात रिक्षाचालकाची असहाय्यता या महिलेला सहन झाली नाही. महिलेने आपली छत्री रिक्षाचालकाच्या डोक्यावर धरली, बुलंदशहरमधील कलाआम चौकातील हा फोटो आहे. महिला हिंदू आणि रिक्षाचालक मुस्लिम आहे.

हेही पाहा- शिक्षकांनी सांगितलं क कबुतराचा अन् विद्यार्थ्यांने संपूर्ण बाराखडीच कबुतरावर लिहिली; नेटकरी म्हणाले, “टॅलेंट आहे पण…”

नेटकऱ्यांकडून महिलेचं तोंडभरून कौतुक –

सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच नेटकरी या महिलेचं खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी हीच खरी माणुसकी असल्याचं म्हटलं आहे. तर कोणी, स्वतः उन्हाचा त्रास सहन करा पण कोणाच्या तरी वाटेवरील सावली व्हा, अशी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “कडक उन्हात आपुलकीचा गारवा.” सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.