सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कुठे गुलाबजामून बर्गरचा विचित्र व्हिडिओ दिसून येतो, तर कुठे ६० वर्षांची व्यक्ती मोठी इमारत चढताना दिसून येते. या व्हिडिओंमुळे लोकांचे मनोरंजन देखील होत आहे. दरम्यान तुम्हाला पोट धरून हसवेल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये एक महिला मुलांबरोबर घसरगुंडीवरून खाली घसरते, मात्र सुखरूप खाली येण्याऐवजी ती दणकन जमिनीवर आदळते. महिलेचे तोंड जमिनीलाच धडकते. या घटनेत तिला इजा झाल्याचे दिसून येत नाही. इन्स्टाग्रामवर बटरफ्लाय माहीने ही पोस्ट शेअर केली आहे. महिला दणकन आपटताच सर्वत्र हशा पिकला. विशेष म्हणजे या घटनेनंतर महिलेला देखील हसू आले.
नेटकरी म्हणाले जोरदार लागली तरी..
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर यावर हसले तर काहींनी चिंता व्यक्त केली. महिलेला जोरदार लागले असेल असे एका यूजरने म्हटले आहे. तर महिलेला लागले असताना लोक असे हसत असल्याचे म्हणत एका यूजरने नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर पोट धरून हसवणाऱ्या व्हिडिओंची काही कमी नाही. अलिकडेच सोशल मीडियावर एका शिक्षिकेची पोस्ट व्हायरल झाली आहे. या शिक्षिकेने आपल्या पहिल्या वर्गातील मुलांना तिचे चित्र काढण्यास सांगितले होते. त्यावर विद्यार्थ्यांनीही चित्रविचित्र चित्रे काढून शिक्षिकेला हैराण केले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे पाहून तिला देखील हसू आवरले नाही.