सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळीनिमित्त अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. डान्स, गाणी, रांगोळी, मेकअप, रेसिपीचे अनेक व्हिडीओ चर्चेत येत आहे.सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये फटाक्यांची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल फटाक्यांची हेअरस्टाइल म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, एका मुलीच्या केसात फुले नाही तर फटाके माळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तुम्हाला लवंगी फटाका ,सुतळी बॉम्ब, भुईचक्र, केसाना लावताना दिसत आहे.अशी अनोखी हेअरस्टाइल तुम्ही कधी बघितली नसावी.सध्या या हेअर स्टाइलची चांगलीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : काय सांगता! भर लग्नात नवरदेवाने खेळण्यातील घोड्यावर घेतली एन्ट्री, वरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
rishav_hairstylist_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “थेट चंद्रावर लॅन्ड होईल” तर एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “आज चंद्रयान ४ लॉन्च होणार आहे” अनेक युजर्सनी लिहिलेय, “फक्त एका आगपेटीच्या काडीची गरज आहे”