Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. अशात महाराष्ट्राची संस्कृती असलेली लावणी सुद्धा अनेक जण सादर करताना दिसतात. सध्या असाच एक लावणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणीसह लावणीवर थिरकताना दिसत आहे. त्यांनी सादर केलेली अप्रतिम लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
लावणी ही अत्यंत सुंदर अशी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य कला आहे. पूर्वी महिला लावणी सादर करायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी सादर करताना दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तरुणीबरोबर सुंदर लावणी सादर करणारा तरुण दिसेल. व्हिडीओत तुम्हाला तरुणीने नऊवारी आणि तरुणाने कुर्ती आणि धोती नेसलेली दिसेल. व्हिडीओत तुम्हाला हे दोघेही ‘मला पिरतिच्या झुल्यात झुलवा’ या लोकप्रिय गाण्यावर लावणी करताना सादर करताना दिसत आहे. दोघेही खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. तरुणाच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही भारावून जाल. या दोघांची रंगलेली जुगलबंदी पाहून कोणीही थक्क होईल. दोघांचे डान्स स्पेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव इतके अप्रतिम आहे की क्षणभरासाठी तुमची नजर यांच्यावरून हटणार नाही. काही लोक व्हिडीओ पाहून म्हणेल, “याला म्हणतात खरी कला”

हेही वाचा :शिवजयंतीचे असे बॅनर अख्या महाराष्ट्रात दिसणार नाही! चिमुकल्यांनी दिल्या हटके शुभेच्छा, व्हायरल बॅनरचा फोटो एकदा पाहाच

niraj_patel_06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोणीही तुमच्या ऊर्जेला मॅच करू शकत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर, अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह कडक.. खूप छान लावणी तोडा केला.” अनेक युजर्सना या दोघांची लावणी खूप आवडली. अनेकांनी या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
या तरुणाचे नाव नीरज पटेल आहे. तो खूप उत्तम डान्सर आहे आणि तरुणीचे नाव श्रद्धा खोंडे आहे. ही तरुणीसुद्धा खूप सुंदर डान्सर आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young boy dance on lavani with a young girl video goes viral on social media ndj