Viral Video : रांगोळीला भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोलाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी आवर्जून रांगोळी काढली जाते. सण असो वा उत्सव किंवा कोणताही कार्यक्रम रांगोळी ही सुशोभीकरणासाठी काढतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सुरेख रांगोळी काढताना दिसत आहे. या तरुणाची रांगाळी पाहून तुम्हीही त्याचे चाहते व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण रस्त्यावर सुंदर रांगोळी काढताना दिसत आहे. त्याची रांगोळी काढण्याची कला पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तो सहजपणे विशाल आणि सुरेख रांगोळी काढताना दिसतोय. प्रतिक असे या तरुणाचे नाव असून हा तरुण कोल्हापूरचा आहे. हा सुरेख रांगोळी कलाकार आहे.

हेही वाचा : VIDEO : याला म्हणतात प्रेम! पराभवानंतर अनुष्काने विराटला मारली मिठी, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

प्रतिकने pratik.21artist या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून असे अनेक रांगोळीचे व्हिडीओ त्याने या अकाउंटवरुन शेअर केले आहे. प्रतिकची ही अनोखी कला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात कला” तर एका युजरने लिहिलेय, “कोल्हापूरकर जन्माने कलाकार म्हणून येतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुलं मुलींपेक्षा चांगली रांगोळी काढतात” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून तरुणाचे कौतुक केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young boy in kolhapur draw a amazing rangoli design on road video goes viral of rangoli artist ndj