Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करतात. डान्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले लावणी नृत्याविषयी प्रत्येकाला माहिती असेलच. सोशल मीडियावर अनेक जण अप्रतिम असे लावणी नृत्य सादर करताना दिसतात. विशेषत:लावणी नृत्य हे महिला सादर करतात पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सर्व प्रेक्षकांसमोर लावणी नृत्य सादर करताना दिसत आहे. हा लावणी नृत्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (a young boy performed amazing lavani dance in audience with amazing face expression video goes viral)त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणाने प्रेक्षकांमध्ये सादर केली अप्रतिम लावणी; व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला असंख्य प्रेक्षक दिसतील. या प्रेक्षकांमध्ये एका तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा तरुण भर प्रेक्षकांमध्ये चंद्रा गाण्यावर अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसत आहे. त्याच्या प्रत्येक डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. इतर प्रेक्षक सुद्धा त्याच्या कडे कौतुकाने बघत आहे. काही लोक त्याचा व्हिडीओ शूट करत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

vivek_patil_dz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा अपूर्वा निषाद गाते तेव्हा महेश हारगुडे..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माहोल बनवला भावा” तर एका युजरने लिहिलेय, “बाण लागला रं” आणखी एका युजरने लिहिलेय, “मस्त केला डान्स” एक युजर लिहितो, “चंद्रा गाण्यावर केलेला आज पर्यंत सर्वात सुंदर डान्स” काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी सुद्धा तरुणांचे लावणी सादर करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस लवकर उतरतात.