Viral Video : आई मुलाचे नाते हे जगावेगळे असतात. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. आई नेहमी मुलांच्या हिताचा विचार करते आणि मुलांच्या आनंदासाठी झटते पण अनेकदा आपण आईला गृहित धरतो आणि आईविषयी प्रेम व्यक्त करताना कचरतो. तिला सॉरी थँक्यू काहीच म्हणत नाही पण आपण आईचे आभार मानले पाहिजे, चूक झाली तर तिची माफी मागितली पाहिजे.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्टँडअप कॉमेडियन सौरभ भोसले याच्या कार्यक्रमात एक तरुण भर स्टेज उभा राहून आईची माफी मागतो. पुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
हा व्हायरल व्हिडीओ सौरभ भोसले याच्या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण स्टेजवर येतो आणि हातात माइक घेऊन बोलायला सुरुवात करतो
तरुण – मी सगळ्यांसमोर आज चूक मान्य करतो की माझ्या आईचा माझ्याकडून आजपर्यंत खूप वेळा अपमान झालेला आहे. आई आज समोर बसलेली आहे. मी सगळ्यांसमोर माफी मागतोय..
सर्वजण टाळ्या वाजवतात.
सौरभ भोसले – आईसाहेब माफी मंजूर आहे का? माफी मंजूर आहे का तुम्हाला?
प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आईचे डोळे पाणावलेले दिसून येतात आणि आई होकारार्थी मान हलवते.
सौरभ भोसले त्यांना स्टेज येताय का विचारतो तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेली आई पुढे येते.
सौरभ तरुणाला म्हणतो, “भाऊ लय डेरिंग लागतं हे करायला लय डेरिंग लागतं आणि तुझ्यात ते आहे
सौरभ आईला विचारतो, “आता माफी मागितली लेकाने तुम्हाला काय म्हणायचंय त्याला”
आई म्हणते, “काही नाही बोलायचं त्याने माफी मागितली हेच माझ्यासाठी खूप आहे.
सौरभ – त्याचं प्रेम आहे तुमच्यावर?
तरुणाची आई – हो
सौरभ – फक्त बोलून दाखवत नाही
सौरभ – अभिमान आहे तुम्हाला?
आई – हो
सौरभ शेवटी दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवण्यास सांगतो आणि शेवटी म्हणतो, “आजकालच्या काळामध्ये आईविषयी बापाविषयी प्रेम व्यक्त फक्त स्टेटसमध्ये होतं या कार्यकर्त्याने स्टेजवर येऊन आईची माफी मागितली एवढ्या सगळ्या लोकांपुढे. लय डेरिंग लागतं एका वाक्यात सांगतो, तुम्ही तुमच्या पोराला खूप भारी वाढवलंय खूप भारी वाढवलंय.” हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
saurabh_s_bhosale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असाच संवाद महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वाढावा. बास. जय शिवराय.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे फक्त तुझ्याच कार्यक्रमात होऊ शकतं दादा” तर एका युजरने लिहिलेय, “आई आहे म्हणून तर आज आपण सगळे आहोत” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई ची जागा या जगात दूसरी कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही” एक युजर लिहितो, “आज कित्येक मुलाच्या मनातल मांडले भाऊ ने …” तर एक युजर लिहितो, “मुल नाही व्यक्त करू शकत त्यांचं प्रेम..”