Viral Video : सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कोणी भन्नाट जुगाड सांगताना दिसतो तर कोणी हटके गोष्टी शेअर करताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण रॅप गाताना दिसतोय. या तरुणाचा रॅप ऐकुन तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका रेल्वेच्या डब्यातील आहे. चालत्या रेल्वेमध्ये हा तरुण रॅप गाताना दिसतो. आजुबाजूला बसलेले प्रवासी त्याचा रॅप ऐकताना दिसत आहे. या तरुणाचा रॅप ते मनापासून ऐकताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण रॅप म्हणतो,

“अरे आम्ही जळगावची पोरं
आहे लयी साधी भोळं
जातायत फिरायला आम्ही मुंबई अन् पुणं
आख्खी दुनियापेक्षा भारी जळगावच जुनं

गळ्यामध्ये घाली चोवीस कॅरेट सोनं
काय.. हा चोवीस कॅरेट सोनं

आय जस्ट लाइक
आय लव्ह कॅनडा
पण कॅनडापेक्षा भारी विषय आमचा पारोळा
कधी कमी नाही समजत आम्ही कोणाला
इथे रॅली काढतो आम्ही प्रत्येक सणाला
काय..हा प्रत्येक सणाला
अरे क्या बोलती मेरे खानदेश की पब्लिक
मेरे हेटर्स को है मेरे गानों से तकलीफ
छोटे बडे बच्चे मेरे गानो के फॅन
और हक से बोलते पब्लिक मुझे परोले की शान है क्या”

हेही वाचा : “इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

rahulgadhari_rg या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “Live Performance” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारी, एकनंबर भावा” तर एका युजरने लिहिलेय, “मी खानदेशी नाही पण आवडला मला” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ खरच आपलं पारोळा आपली शान आहे.” एक युजर लिहिते, “खानदेश, विषय हाय का.. माहेर आहे आपले” तर एक दुसरी युजर लिहिते, “चलता रहे चलता रहे भाई खानदेश च नाव असाच पुढे घेऊन जा.”

हेही वाचा : “जीवन-मरणाचा खेळ…” दोन जिराफांवर हल्ला करण्यासाठी सिंहाचा डावपेच; असा धडकी भरवणारा VIDEO कधीही पाहिला नसेल

हा तरुण जळगावच्या पारोळा तालुक्यातील आहे. हा रॅप ऐकुन तुम्हीही थक्क व्हाल. या तरुणाचे नाव राहुल गधारी असून तो त्याचे नवनवीन रॅपचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक रॅपवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करतात.