Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेऊन उखाणा सांगितला जातो. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. महिलांबरोबर पुरुष देखील आवडीने उखाणे घेतात.
सध्या असाच एक उखाणा व्हायरल होत आहे. एका कोल्हापूरच्या तरुणाने भन्नाट उखाणा घेतला आहे. हा कोल्हापूरी उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवीन विवाहित जोडपं दिसेल. व्हिडीओत विवाहित तरुणाला बायकोचे नाव घेण्यास म्हणजेच उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला जातो. तेव्हा हा तरुण कोल्हापूरी अंदाजात रांगडा उखाणा घेतो.
उखाणा घेताना तो म्हणतो, “रांगड्या कोल्हापूरच्या सुम्याची पुण्याची बायको हाय.. रांगड्या कोल्हापूरच्या सुम्याची पुण्याची बायको हाय..; श्वेताचं नाव घेतो, आवरा लवकर भूका लागल्या, जेवा वाढता की नाय..” त्याचा हा भन्नाट उखाणा ऐकून बायकोसह सर्व जण हसताना दिसतात.

हेही वाचा : अन्नाची किंमत शेतकरीच समजू शकतो! बसमध्ये खाली सांडलेलं धान्य गोळा करतेय आजी, Video होतोय व्हायरल

rjsumitt या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रांगडा उखाणा आवडला काय?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लय भारी” तर एका युजरने लिहिलेय, “वाह” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोल्हापूरी भाषा ऐकायला खूप गोड वाटते.