Viral Video : विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. विश्वचषक हरल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही क्रिकेटचे चाहते रडताना सुद्धा दिसून आले. काही व्हिडीओ तर खूप भावूक करणारे होते.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.कारण या व्हिडीओमध्ये एका तरुणाने भारत विश्वचषक का हरला, या मागील मजेशीर कारण सांगितले आहे. तरुणाचे उत्तर ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत एक व्यक्ती एका तरुणाला विचारतात की आपण विश्वचषक का हरलो तेव्हा तरुण विश्वचषक हरण्यामागील कारण सांगतो, “आपल्या भारत देशाची एक परंपरा आहे की घरी जर आपल्या पाहूणे आले तर आपण त्यांना रिकाम्या हात पाठवत नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील क्रिकेटर्स आपल्या देशात पाहूणे म्हणून आले होते, म्हणून त्यांना रिकाम्या हाती पाठवणे, योग्य नव्हतं. म्हणून त्यांना ट्रॉफी देऊन आपण विजयी केलं आणि भारताची संस्कृती जपली” तरुणाचं हे मजेशीर उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल.

हेही वाचा : वय कितीही असू द्या मनात फक्त जिद्द पाहिजे!नऊवारी नेसून पोहतेय आज्जी, व्हिडीओ होतोय व्हायरल

admin_maya14 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुझं बोलणं ऐकून बरं वाटलं” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “पाहूणे आल्यावर आपण फक्त चहा देतो ते कप पण घेऊन गेले” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी सारं दु:ख विसरलो मित्रा”