Viral Video : हल्ली लग्नापूर्वी प्री वेडींग फोटोशूट लोक खूप आवडीने करतात. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन जोडीदाराबरोबर फोटोशूट करतात. वेगवेगळ्या पोझेझ देत छान फोटो किंवा व्हिडीओ काढतात. कधी कोणी समुद्रकिनारी किंवा नदीशेजारी फोटोशूट करतात, तर कधी कोणी डोंगर परिसरात फोटोशूट करतात. कोणी गार्डनमध्ये फोटोशूट करतात तर कोणी लक्झरी बॅकग्राउंडमध्ये फोटोशूट करतात.

सध्या असाच एक फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं चक्क शेतात प्री वेडींग फोटशूट करताना दिसत आहे. जोडप्याचा हा फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्ही आजवर अनेक फोटोशूट पाहिले असेल पण हा फोटोशूट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young couple have done pre wedding photoshoot i a farm netizens said only farmer can do this)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपं शेतामध्ये फोटोशूट करत आहे. तरुण मुलगा शेतकऱ्याच्या वेशभूषेत असून त्याने धोतर नेसले आहे आणि पांढरा सदरा घातला आहे. डोक्यावर पागोटा बांधला आहे आणि तरुणीने नऊवारी नेसली आहे. मराठी वेशभूषेत हे तरुण तरुणी खूप सुंदर दिसत आहे. हे जोडपे हातात काठी घेऊन नाचताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्हाला कॅमरामॅन सुद्धा दिसेल जो शुट करताना दिसतोय.
विशेष म्हणजे या प्री वेडींग फोटशूटमध्ये या जोडप्याच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. व्हिडीओत तुम्हाला इतर महिला सुद्धा दिसतील ज्या मराठमोळ्या वेशभूषेत दिसत आहे. या जोडप्याचा कुटुंबाबरोबर केलेला हा अनोखा फोटोशूट कोणालाही आवडेल.

हेही वाचा : कमाल! पठ्ठ्याने एका मिनिटात फोडले चक्क ‘एवढे’ अक्रोड; VIDEO पाहून व्हाल थक्क; गिनीज रेकॉर्ड्सनेही घेतली दखल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: “माऊली -माऊली काय सांगू…” पुणेरी पाटीनं वारकऱ्यांचं लक्ष वेधलं; आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी पाहाच

dark_house_photography_officia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोण कोण करणार अशी प्री वेडींग? या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना ही भन्नाट कल्पना आवडली आहे. एका युजरने लिहिलेय, “शेतकरी किंग आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हा नाद फक्त शेतकरी करू शकतो….” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझं स्वप्न आहे”