Viral Video : प्रत्येकाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो. जेव्हा ते स्वप्न पूर्ण होते, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा असतो पण स्वप्न जर पूर्ण झाले नाही तर खूप जास्त दु:ख होते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरुणी ढसा ढसा रडताना दिसत आहे. पोलीस पदी निवड न झाल्यामुळे तिला रडू कोसळते पण पुढल्या क्षणी असे काही घडते की तिचे अश्रु आनंदाश्रू मध्ये बदलतात. या तरुणीबरोबर नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”

पोलीस भरतीचा निकाल पाहून तरुणीचे अश्रु अनावर

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. तिच्या मैत्रिणी तिला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे अश्रु पुसत आहे. पोलीस पदी निवड न झाल्यामुळे ती दु:खी झाली आहे. त्यानंतर अचानक एक व्यक्ती येतात आणि तिच्या अंगावर गुलाल टाकतात. तेव्हा तिच्या शेजारी बसलेल्या मुली बाजूला होतात आणि जोर जोराने हसताना दिसतात व सर्व जण टाळ्या वाजवतात आणि पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करतात. त्यानंतर ही तरुणी भावूक होते. या व्हिडीओवर लिहिलेय, “अगोदर मुद्दाम नापास झाली, हे सांगितले होते नंतर असा सुखद धक्का दिला. नागपूर ग्रामीण पोलीस” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “बाबांनी गृहपाठ केला नाही” विद्यार्थ्याने सांगितले गृहपाठ न करण्याचे कारण, प्रामाणिकपणा पाहून शिक्षक…; VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

sai_nirman_acadmy_shirdi आणि pramod_kadam_7222 यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुखद धक्का नागपूर ग्रामीण” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं तर अगोदर डोळे भरून आले पण काय नंतर कळालं दीदी पास झाली म्हणून. खूप आनंद वाटला. अभिनंदन ताई – एक शेतकरी” तर एका युजरने लिहिलेय, “तिचा प्रवास तिचा संघर्ष फक्त तिला माहीत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “संघर्षात बळ असेल तर शेवटी गुलालाला देखील यावं लागतं..!”

एक युजर लिहितो, “ताईच्या भावना फक्त आणि फक्त एक मनापासून भरती मध्ये मेहनत करणारी व्यक्तीचं समजू शकते” तर एक दुसरा युजर लिहितो, “मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो आनंद. मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. तुझ्या यशाबद्दल अभिनंदन”

Story img Loader