Video Viral : सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी प्रवासी भांडताना दिसून येतात तर कधी प्रवासी गाणं म्हणताना दिसून येतात. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे.
दरदिवशी लाखो लोकं मेट्रोनी प्रवास करतात. अनेकदा मेट्रोमध्ये गर्दी असते पण मेट्रोत गर्दी नसेल तर अनेक प्रवासी रिल्स-व्हिडीओ बनवताना दिसून येतात. ही तरुणीसुद्धा मेट्रोतील कमी गर्दी पाहून रिल्स बनवताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला वाटेल हा व्हिडीओ दिल्लीचा आहे पण ही दिल्लीतील मेट्रो नाही तर भोपालची मेट्रो आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसत आहे. दोन तरुणी तिचा व्हिडीओ शुट करताना दिसत आहे. मेट्रोमध्ये गर्दी खूप कमी आहे पण दुरवरुन काही लोक डान्स करणाऱ्या तरुणीकडे बघताना व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा : हॉरर चित्रपट पाहत होती महिला, अचानक असे काही झाले…, व्हायरल VIDEO एकदा पाहाच…

bhopali_buzz’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भोपाल मेट्रोत आपले स्वागत आहे” या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला “किसी दिन ये तमाशा मुस्कुरा कर हम भी देखेंगे” हे गाणं लावण्यात आलं आहे.
दिल्ली मेट्रोतील सुद्धा अनेक प्रकरणे नेहमी चर्चेत येतात. कधी भांडणाचे व्हिडीओ तर कधी गैरवर्तणूकीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोत डान्स करतानाचे व्हिडीओ सुद्धा यापूर्वी अनेकदा व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young girl dance in bhopal metro video goes viral on instagram social media ndj
Show comments