Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो, कधी कोणी भन्नाट जुगाड दाखवताना दिसतो तर कधी कोणी स्टंट करताना दिसतो. अनेक जण सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. (a young girl dance on a electric pole video goes viral on social media really is reel important than life)
सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी चक्क विजेच्या खांबावर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. हा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठा विजेचा खांब दिसेल. या खांबावर एक तरुणी उभी असलेली दिसत आहे. पुढे ही तरुणी डान्स करताना दिसते. “दिल देख रहा रस्ता अब दिलदार का” या गाण्यावर ही तरुणी डान्स करत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून ही तरुणी फक्त डान्स करण्यासाठी म्हणजेच रील बनवण्यासाठी चक्क विजेच्या खांबावर चढली. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्सनी टीका केली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
maheshpatel8819 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यमराज सुट्टीवर आहे” तर एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “दिल देख रहा है रस्ता यमराज का” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्वीच बंद आहे का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये जीव धोक्यात घालून लोक रील व्हिडीओ शूट करताना दिसले आहे.