Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धापर्यंत अनेक जण डान्स बिनधास्त डान्स करताना दिसतात. सध्या असाच एका तरुणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये ही तरुणी तुफान डान्स करताना दिसत आहे. एका कॉलेजच्या कार्यक्रमात ती डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स पाहून तुम्हालाही तुमच्या कॉलेजची दिवसं आठवू शकतात.
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला कॉलेजच्या तरुण विद्यार्थांची खूप गर्दी दिसून येईल. व्हिडीओत एक तरुणी काळी साडी नेसून सुंदर डान्स करताना दिसत आहे. “चले ही जाना है, नजर चुरा के यूँ..” या सदाबहार गाण्यावर ती सुंदर स्टेप्स करुन नाचताना दिसतेय. तिचे हावभाव आणि डान्स स्टाइल पाहून कोणीही अवाक् होईल. तिचा डान्स पाहून कॉलेजची तरुण तरुणी जोरजोराने टाळ्या वाजवताना दिसत आहे. अनेक जण तिचा डान्स मोबाईलच्या कॅमेरामध्ये शूट करताना दिसत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या कॉलेजची आठवण येऊ शकते.
हेही वाचा : लपंडाव खेळताना बहिणीला शोधण्यासाठी भावाने लढवली अनोखी युक्ती, मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
endless_._vision या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ एका कॉलेजच्या कार्यक्रमातील असल्याचे म्हटले जात आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “गाणं, स्टेप्स आणि हावभाव” तर एका युजरने लिहिलेय, “कॉलेजच्या दिवसांची आवठण आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात टॅलेंट”