Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोक आवडीने डान्स करताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून अनेकदा गोड हसू चेहऱ्यावर येते. सध्या असाच एक सुंदर डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी नातीबरोबर डान्स करताना दिसत आहे. आजी नातीचा हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांचे जुने दिवस आठवतील तर काही लोकांना त्यांच्या आजीबरोबरचे सुंदर क्षण आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी तिच्या आजीबरोबर डान्सचा आनंद घेताना दिसतेय. ती आणि तिची आजी सुंदर डान्स करताना दिसत आहे. पुष्पा चित्रपटातील सामी या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आजीची ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल. आजी प्रत्येक डान्स स्टेपचा आनंद घेताना दिसत आहे. आजी नातीची ही गोंडस जोडी पाहून तुम्हालाही व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल.

हेही वाचा : समुद्राच्या उंच लाटांमध्ये उभे राहून रोमान्स; प्रियकराच्या डोळ्यांदेखत वाहून गेली प्रेयसी; धडकी भरविणारा VIDEO व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल

aditi_vinayak_dravid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझी पुष्पा फायर आहे फायर” आदिती ही उत्तम अभिनेत्री असून सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती अनेकदा तिच्या आजीबरोबरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. युजर्स तिच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

या वरील व्हिडीओवर सुद्धा अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “National crush जाहीर करु या का आपण ह्या क्यूटीला” तर एका युजरने लिहिलेय, “तुझ्या आजीला पाहिल्यावर मला माझ्या आजीची खूप आठवण येते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप खूप गोड आहे आजी तुझी.. मागच्या वेळेला तिचा पुरणपोळी बनवताना व्हिडीओ टाकला होतास.. मला माझ्या आजीची आठवण आली…खूप खूप प्रेम आजीला आणि भरपूर आरोग्य लाभून दे ही प्रार्थना”