VIDEO : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांचे अनेक डान्स चर्चेत येतात. काही डान्स व्हिडीओ इतके सुंदर असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी खानदेशी डान्स करताना दिसत आहे. आजीचा अस्सल खानदेशी डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खानदेशी हा महाराष्ट्रातील एक भाग असून यात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हे येतात. खानदेशी पदार्थांविषयी तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल पण तुम्ही खानदेशी डान्स पाहिला का? आजीचा हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हेही वाचा : रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशलची स्वाक्षरी पाहिली का? फोटो होतोय व्हायरल
हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला डान्स करताना करताना दिसत आहे. यात काही तरुणीसुद्धा डान्स करताहेत पण सर्वांचे लक्ष एका आजीने वेधून घेतले आहे कारण आजी ज्या प्रकारे डान्स करतेय ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आजी अस्सल खानदेशी डान्स करताना दिसताहेत. डान्स करतान आजीची ऊर्जा पाहून कोणीही आजीच्या प्रेमात पडेल. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊवारी नेसलेल्या आजीने खूप सुरेख डान्स केला आहे. व्हिडीओत पुढे तुम्हाला आजीबरोबर एक तरुणी सुद्धा डान्स करताना दिसताहेत पण सर्वांचे लक्ष आजीने वेधून घेतले आहे. आजीच्या डान्ससमोर ही तरुणी सुद्धा फेल पडली. खानदेशी डान्स करतानाचा आजीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
sambal_king_sidhu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणाचा डान्स आवडला?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.अनेक युजर्सनी आजीचा डान्स आवडल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “आजी एक नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटी जुनं ते सोनं” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीपुढे सगळे फेल” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करतात.