Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी त्यांचे विचार मांडताना दिसतात तर कधी कोणी त्यांच्या समस्या सांगताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पीएचडी झालेली तरुणी भजी विकताना दिसत आहे. ती या व्हायरल व्हिडीओमध्ये सरकारवर टिका करताना दिसते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या स्टॉलवर भजी विकताना दिसत आहे. तिच्या स्टॉलवर लोकांची भयंकर गर्दी आहे. ती तिच्याविषयी बोलताना दिसत आहे. कोणीतरी तिचा हा व्हिडीओ शूट केला आहे. ती म्हणते, “आमच्या सारखे गरीब आईवडिलांचे मुले जेव्हा स्वप्न पाहतात आणि सर्व काही विकून मोठमोठ्या विद्यापीठात शिकतात.पण आमच्या आईवडिलांकडे २५ -३० लाख रूपये नाही.. पैसे देऊन नोकरी करण्याचा.. मोदीजींनी सांगितले भजी विका. आमच्याकडे आज हाच पर्याय आहे. तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलाल तर तुम्हाला पकडले जाईल. आज देशातील तरुणाई इतकी लाचार झाली आहे की प्रिमियम युनिव्हसर्टीमधून पीएचडी केल्यानंतर सु्द्धा भजी विकत आहे. माझी डिग्री पाहा. स्टॉलसमोर माझी डिग्री लावली आहे.”
या तरुणीने स्टॉलसमोर तिचा डिग्री घेतानाचा फोटो लावला आहे. तिने तिच्या स्टॉलला ‘पीएचडी पकोडेवाली’ असे नाव दिले आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”

हेही वाचा : हीच आपली संस्कृती! गावोगावी भटकंती करणाऱ्या सुंदर नंदीबैलाचा Video होतोय व्हायरल

Dr. Sanjay Rakibe या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक भारतीय नागरिकाची मान गर्वाने उंच झाली असेल.
कारण एका दहावी नापास माणसाने पीएचडी झालेल्या नागरीकाला पकोडे विकायला लावून देशाचा विकास साधला आहे. मोदीचा नवा भारत. हिच वेळ आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला येणार आहे…”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साधा १२ वी पास पणं आज काल खाजगी नोकरी मिळवू शकतो पणं यांना phd करून सरकारी जावई बनायचं असतं. बाय द वे यांची कशात आहे ते सांगा की..” तर एका युजरने लिहिलेय, “कोणीही त्यांना हवा तो व्यवसाय करू शकतो (जोपर्यंत तो कायदेशीर आहे). कोण म्हणाले पीएचडी झालेली व्यक्ती स्वयंपाक करू शकत नाही आणि करू नये? तुमचे विधान तुमची मानसिकता दाखवते.

Story img Loader