Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ एका महाविद्यालयातील आहे. एक महोत्सवात ही तरुणी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.मला पिरतिच्या झुल्यात झुलवा या मराठी लावणी गीतावर ती सुंदर डान्स करताना दिसत आहे. ती खूप सुरेख डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा : VIDEO : सिंहाच्या कळपाने चालत्या गाडीवर चढवला हल्ला! पाहा थरारक व्हिडीओ

maharashtra_remix_reel या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मराठी सौंदर्य” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स” तर एका युजरने लिहिलेय, “नाद खुळा” आणखी एका युजरने लिहिलेय, “कडक”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young girl lavani dance video in nashik goes viral on social media ndj