Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी लावणी अप्रतिम लावणी सादर करताना दिसत आहे. या लावणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एका नृत्यालयाच्या कार्यक्रमात ही तरुणी लावणी सादर करत आहे. (a young girl present amazing lavani dance in front of her Gautami patil fail video goes viral)
तरुणीने सादर केली सुरेख लावणी (a young girl present amazing lavani)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल जी एका मोठ्या स्टेजवर अप्रतिम लावणी सादर करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिच्या प्रत्येक स्टेपवर प्रेक्षक जल्लोष करताना दिसत आहे. “कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?” या अप्रतिम गाण्यावर ही तरुणी लावणी सादर करताना दिसत आहे. कलासिद्धी नृत्यालय आयोजित ‘कलाश्री’ विविधरंगी नृ्त्यविष्कार कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. लावणी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नृत्यप्रकार असून या नृत्यप्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोशल मीडियावर अनेक जण लावणी नृत्य सादर करतानाचे व्हिडीओ शेअर करतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
yari__dosti_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नाद फक्त मराठी भाषेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “साधेपणाने माणूस किती गोड दिसतो” तर एका युजरने लिहिलेय, “अस्सल मराठी सौंदर्य विथ अस्सल मराठी कलानृत्य” आणखी एका युजरने लिहिलेय, “गौतमी पाटील पेक्षा किती पटीने छान नृत्य केलं आहे. या ताईने यालाच म्हणतात मराठी संस्कृती.” एक युजर लिहितो, “साधेपणाचे हे एक उत्तम उदाहरण आहे खूप छान बाळा” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळे डान्स प्रकार सादर करताना दिसतात.