Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाण्याचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी आवर्जून उखाणा घेतला जातो. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच उखाणा म्हणतात. तुम्ही अनेक उखाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिली असतील. सध्या असाच एका तरुणीचा भन्नाट उखाणा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी उखाण्याद्वारे जोडीदार भाव खात असल्याचे सांगते. हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. ती सुंदर उखाणा घेताना दिसतेय. ती उखाणा घेताना म्हणते, “गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव.. राव दिसतात बरे पण खातात खूप भाव” हा उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुणीने नाकात नथ आणि कपाळावर टिकली लावली आहे. ती खूप सुंदर दिसत आहे. अनेकांचा आवडता पदार्थ भजी आणि पावचा शब्दप्रयोग करून या तरुणीने सुंदर उखाणा घेतलाय. त्यामुळे भजी आणि पाव खाणाऱ्यांना सुद्धा हा उखाणा आवडू शकतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO : अयोध्येतील हा कावळा ‘राम राम’ म्हणतोय; व्हिडीओ पाहून अवाक् व्हाल

flyhighbantai या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “म्हणून जास्त भावं नाही द्यायचा…मराठी, मराठी उखाणा, मराठी मुलगी, मराठी कॉमेडी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव” तर एका युजरने लिहिलेय, “भाव तर कधीच दिला नव्हता” आणखी एका युजरने थेट उखाणा लिहिलाय, “चालतील तुझे नखरे, खा तू भाव, तु माझी मिसळ आणि मी तुझा पाव” एक युजर लिहितो, “गोड दिसते आणि आवाज सुद्धा खूप गोड आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना हा उखाणा आवडलाय.