Viral Video : सोशल मीडियावर अनेक क्रिएटिव्ह व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक जण भन्नाट भन्नाट क्रिएटिव्हीटी दाखवून व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने ‘यहां कदम कदम पर लाखों हसीनाएं है’ या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर एक भन्नाट गाणं गायलं आहे. तिचे गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर लोकप्रिय गाण्यावर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं डान्स करतात तर काही लोकं गाणी म्हणतात पण या तरुणीने शाहरुख खानच्या बादशाह या चित्रपटातील वोह लडकी जो सबसे अलग है या गाण्याच्या चालीवर भन्नाट आणि मजेशीर गाणं गायलं आहे. तिचं गाणं ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर अनेक जण असे नवनवीन क्रिएटिव्ह व्हिडीओ शेअर करत असतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी गच्चीवरील सुखलेले कपडे काढताना गाणं गुणगुणताना दिसत आहे. ही तरुणी गाणं गाताना म्हणते, “कभी करिअर की टेन्शन ओहो, कभी फॅमिली प्रॉब्लेम्स आहा… कभी सडन डिप्रेशन ओहो, कभी पैसो की कमी आहा.. हा यहा कदम कदम पर लाखो समस्याये है…” तिचे हे गाणं ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. या तरुणीने या गाण्यातून सामान्य लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. अगदी सोप्या भाषेत तिने ‘यहां कदम कदम पर लाखों हसीनाएं है’ या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर आपले मत मांडले आहे.

हेही वाचा : तारे जमीन पर! चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुरुजींनी शिकवला मनसोक्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

garimaa0_0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मिडल क्लासमध्ये मिडल क्लास” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप भारी लिरिक्स” तर एका युजरने लिहिलेय, “बहिणी, व्हिडीओ पाहून भावूक झालो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मध्यमवर्गीय लोकांची समस्या” अनेक युजर्सनी तरुणीचे लिरिक्स खरोखर मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यातील चढ उतार सांगणारे आहेत, असे लिहिलेय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young girl sing a parody song of yaha kadam kadam par lakho hasinaye hai in baadshah movie and told middle class people problems video goes viral ndj
Show comments