Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक डान्सचे सुद्धा व्हिडीओ शेअर करतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तुफान डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला चक्क मायकल जॅक्सनची आठवण येईल. (a young guy dance on moon run not moon walk of Michael Jackson Video goes viral on social media)
मायकल जॅक्शन हा एक गायक आणि डान्सर होता. संगीत आणि मनोरंजन क्षेत्रात त्याचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. २००९ मध्ये मायकल जॅक्सनचे वयाच्या ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याच्या निधनानंतरही लोक त्याचे स्मरण करतात. त्याच्या लोकप्रिय डान्स स्टेप्स करतात. मायकल जॅक्सनचा डान्स फॉलो करणार्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा हा तरुण मायकल जॅक्सनप्रमाणे डान्स करताना दिसत आहे.
हेही वाचा : काय चूक होती त्याची? कांतारा सिनेमा पाहून जोरात ओरडला अन् आईने धोपटला; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
तरुणाने थेट मायकल जॅक्सनला दिली टक्कर
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण सुंदर डान्स करताना दिसेल. तु्म्ही आजवर अनेक डान्स बघितले असेल पण असा डान्स कदाचित पहिल्यांदाच बघाल. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक तरुण स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. या दरम्यान तो मायकल जॅक्सनचा मून वॉक करताना दिसतो पण या तरुणाने ‘मून वॉक’ ऐवजी ‘मून रन’ डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
naughtyworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मून वॉक, मून रन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पण काय ऊर्जा आहे राव” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मायकल जॅक्सनची आठवण आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह काय डान्स करतोय” एक युजर लिहितो, “हा काय प्रकार आहे?” तर एक युजर लिहितो, “मी मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता आहे.”