Viral Video : सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरुन हसवणारे असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक फोटोशूटचा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही आजवर अनेक फोटोशूटचे व्हिडीओ पाहिले असेल पण असा फोटोशूट कुठेच बघितला नसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वांना फोटोशूटचे वेड लागलेले आहे. जो तो फोटोशूट करताना दिसतो आणि फोटोशूट दरम्यान काढलेले फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. तुम्ही अनेक लोकांना वेगवेगळ्या पोझेसमध्ये सुंदर हटके फोटो काढताना पाहिले असेल पण या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवलेला फोटोशूट पाहून तुम्ही डोकं धराल. कारण या व्हिडीओमध्ये एक तरुण फोटोशूट करताना दिसत आहे पण तो रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आणि झोपून फोटोशूट करताना दिसत आहे. त्याचा फोटोशूट पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. (A young guy did a photoshoot in the water flooding on the road video goes viral on social media)

हेही वाचा : Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तरुणाने केला फॉटोशूट

या व्हिडीओत तुम्हाला एक तरुण दिसेल जो रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वेगवेगळ्या पोझेस देत फोटो काढताना दिसत आहे. त्याच्याबरोबर एक कॅमेरामॅन आहे आणि तो त्याचे फोटो काढत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात फोटो काढताना पाहून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे बघून हसताना दिसत आहे तर काही लोक आश्चर्यचकीत होऊन त्याच्याकडे बघताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Top Trending IPO in September : ‘बजाज हाऊसिंग फायनान्स’ अन् ‘आरकेड डेव्हलपर्स’सह ‘हे’ ठरले सप्टेंबरमधील टॉप ट्रेंडिंग आयपीओ

वाचा प्रतिक्रिया

popper_vicky88 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एवढे महान लोक भारतातच राहू शकतात.” तर एका युजरने लिहिलेय, “इतका आत्मविश्वास कुठून येतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “असा फोटोशूट पुन्हा होणे नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.