Video Viral : शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा सुंदर प्रवास असतो. या प्रवासात आपण पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्वाचे धडे शिकतो. येथे आपल्या विचारांना आकार मिळतो. कधीही विसरता न येणारे वर्गमित्र व शिक्षक भेटतात. आयुष्यात प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात शाळेच्या आठवणी नेहमी जीवंत असतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपण भावुक होतो तर काही व्हिडीओ पाहून शाळेतील दिवसांची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण शाळेशी काल्पनिक रित्या संवाद साधत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. (emotional video will make you remember your school days)
असं म्हणतात शाळा हे आपल्याला जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यास आणि विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवते. याच पार्श्वभूमीवर एका तरुणाने शाळेबरोबर केलेला संवाद या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला आहे.
तरुण सांगतो की रस्त्याने जाताना माझी शाळा मला विचारते, “काय रे परीक्षा बरोबर देतोयस ना आयुष्याची?” मी उत्तर दिलं,”आता फक्त खांद्यावर दफ्तर नाहीये एवढच..! नाहीतर अजूनही लोक धडा शिकवून जातात…”
या व्हिडीओत तुम्हाला एका शाळेचे दृश्य दिसेल. हा व्हिडीओ कणकवलीचा आहे आणि निखिल नाईक नावाच्या एका तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
हेही वाचा : “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” भर रस्त्यात तरुणांबरोबर काय घडलं पाहा; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?
kankavli_cha_nikhil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”खूप सुंदर संदेश” तर एका युजरने लिहिलेय, “हे मात्र खरं आहे दादा” आणखी एका युजरने लिहिलेय, “शाळा- एक आठवण कायम सोबत” एक युजर लिहितो, “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी” तर एक युजर लिहितो,” कधी कधी वाटतं आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मन आणि आपली स्वप्न यापेक्षा आपल्या शाळेचा गृहपाठच बरा होता” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावुक झाले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.