Viral Video : सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडीओ समोर येतात. कधी हे व्हिडीओ पाहून धक्का बसतो तर कधी डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही लोक असे जुगाड शोधून काढतात की पाहून कोणीही अवाक् होईल. आज आपण एका अशा व्हिडीओविषयी जाणून घेणार आहोत, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने त्याच्या स्कुटीमध्ये टॉयलेट लावले आणि हा तरुण टायलेट सीटसह रस्त्यावर स्कुटी चालवताना दिसतोय. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral on social media)

हेही वाचा : बापरे! घरात शिरलेल्या सापाला चिमुकलीने स्वतःच्या हाताने काढले बाहेर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भारतीय नारी…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्कुटी दिसेल. ही स्कुटी इतर स्कुटींपेक्षा अनोखी आहे. कारण या स्कुटीला बसण्यासाठी फोमची सीट नाही तर चक्क टॉयलेट सीट आहे. होय, या तरुणाने स्कुटीमध्ये टॉयलेट बसवले आहे. विशेष म्हणजे स्कुटीचे एक्सलेटर वाढवताच कमोडमध्ये फ्लशची सुविधा सुद्धा दिसून येते. त्यानंतर पुढे व्हिडीओमध्ये एक तरुण कमोडवर बसून रस्त्यावरून स्कुटी चालवताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही अनोखी स्कुटी पाहून कोणीही अवाक् होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : PHOTO: डेटिंग ॲपवर मुलीच्या नावानं चॅट करत होता; तरुणानं स्कॅमरला पकडलं जाळ्यात, व्हॉट्सअ‍ॅप चॅट वाचून पोट धरुन हसाल

desiisarcasm या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा जुगाड भारताबाहेर जाऊ नये” तर एका युजरने लिहिलेय, “असा जुगाड फक्त भारतीय करू शकतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोक काहीही करू शकतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर त्यांच्या मित्रांना टॅग केले आहे तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
मागील वर्षी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये स्कुटरवाली टॉयलेट सीट बाथरुमध्ये दिसली होती. स्कुटीचे एस्केलेटर वाढवताच फ्लश होत असते. स्कुटीचा आकार दिलेल्या या टॉयलेट सीटची चांगलीच चर्चा रंगली होती.