Viral Video : अनेक तरुण मंडळी पोलीस भरतीची तयारी करतात. काही लोक सर्व परीक्षा पास होऊन पोलीस बनतात. पोलीस बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण सातत्य आणि कठोर परिश्रम घेतले तर मेहनतीचे फळ मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घरी येतो आणि आईला आपण एमपीएससी परीक्षेत पास झाल्याचे सांगतो. लेकाचं बोलणं ऐकून आईचा आनंद गगनात मावेनासा असतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण मित्राला बरोबर घेऊन घरी येतो. घरातील लाइट बंद असतो आणि त्याची आई झोपलेली असते. हा तरुण लाइट सुरू करतो आणि आईला म्हणतो, “आई एमपीएससीचा निकाल लागला. माझं नाव आहे लिस्टमध्ये.” आणि मुलाचे हे बोलणे ऐकून आईला सुखद धक्का मिळतो. आई आश्चर्याने म्हणते, “आईशप्पथ” त्यानंतर तरुण त्याच्या आईच्या गळ्यात फुलांची माळ घालतो. तिच्या चेहऱ्याला गुलाल लावतो आणि आईच्या पाया पडतो. आईचे देवाचे नाव घेत आनंद व्यक्त करते. तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. हा व्हिडीओ पाहून कोणी भावुक होईल. आई तुझा मुलगा पोलीस झाला. सर्व कष्ट, मेहनत, चिकीटी आणि जिद्द फक्त आपल्या आईसाठी. याचसाठी केला होता अट्टहास”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

mpsc_success_spot या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सर्व कष्ट, मेहनत, चिकाटी आणि जिद्द फक्त आपल्या आईसाठी”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जिंकलास भावा तू..” तर एका युजरने लिहिलेय, “याच क्षणासाठी आपल्याला मेहनत करायची आहे.. फक्त आई वडिलांसाठी संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा क्षण फक्त एक पोलीस भरती करणाऱ्या मुलालाच माहिती आहे. जिंकलास मित्रा तू” एक युजर लिहितो, “अभिनंदन भावा….. आई ला किती आनंद झाला पहा… फक्त एक तर तिला विसरू नको आणि दुसरे म्हणजे तिला म्हातारपणात एकटं सोडू नको” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.