Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही उखाण्याचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही उखाण्याचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. उखाणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे म्हणजे उखाणा घेणे होय. कोणत्याही शुभ प्रसंगी, मंगल कार्यक्रमात उखाणे हे आवर्जून घेतले जातात. पूर्वी फक्त महिला उखाणे घ्यायच्या आता पुरुष मंडळीसुद्धा आवडीने उखाणे घेतात. अनेकदा मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमात उखाणे विचारले जातात. (a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni video goes viral on social media)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर स्टेजवर एक अँकर अंध तरुणांना उखाणे घेण्यास सांगतो. तेव्हा हे तरुण मंडळी भन्नाट उखाणे घेतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर एक अँकर तीन चार अंध तरुणांशी संवाद साधताना दिसत आहे. त्यांना उखाणा घेण्यासाठी आग्रह धरत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : चंद्राच्या प्रकाशात उजळले केदारनाथ धाम मंदिर! आनंद महिंद्रांना आवडला सुंदर फोटो, तोंड भरून केले कौतुक

एक तरुण : धोनीने मारला सिक्स,… माझे जन्माचे फिक्स. संपला विषय
दुसरा तरुण: आता उखाणा येत नाही, तरी पण घेतो थांबा. भाजीत भाजी मेथीची भाजी, …. नाव घेते मी नाचते गणपतीच्या स्टेज वरती. हाय का चांगला? अँकर :एक नंबर
दुसरा तरुण : अय्य इश्य..
अँकर : पैठणी नाही, किमान ब्लाउस पीस तर मिळेलच
दुसरा तरुण : अरे.. इश्श पैठणी देता का बघा की
अँकर : अ.. काय झालं?
पहिला तरुण: बाईईईईई….

अंध तरुणांचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : तरुणाने थेट मायकल जॅक्सनला दिली टक्कर; ‘मून वॉक’ नव्हे तर ‘मून रन’ डान्स केला, व्हिडीओ एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : “दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं” तरुणाने केली भिकाऱ्याची अशी पोलखोल, VIDEO व्हायरल

raj_gondhali6221 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणाचा उखाणा भारी हाय?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी असे अनेक तरुणांचे भन्नाट उखाण्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Story img Loader