A son Sings a song For Mother : असं म्हणतात, “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. आई इतकी माया व प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. ती नेहमी मुलांच्या सुखाचा विचार करते. मुलांसाठी ती वाट्टेल ते करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवींनी अनेकदा कवितेच्या माध्यामातून आईचे गोडवे गायले आहे. आईवर अनेक कविता तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल पण आईवर लिहिलेलं हे गाणं तुम्ही पहिल्यांदा ऐकाल कारण हे गाणं एका तरुणाने त्याच्या आईसाठी लिहिलं आहे.

एका व्हिडीओमध्ये हा तरुण आईसाठी लिहिलेलं गाणं गाताना दिसतो. त्याचं गाणं ऐकून तुमचेही डोळे भरून येईल. काही लोक हे गाणं ऐकल्यावर भावूक होतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा :Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

तरुणाने गायलं आईसाठी गाणं (a lovely song for mother)

या व्हायरल व्हिडीओध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. त्याच्या शेजारी आई उभी आहे. तरुण कॅमेरा एका हातात घेऊन म्हणतो, “आई तुझ्यासाठी लिहिलेल्या या दोन लाइन.
त्रास देणार नाही, ग आई तुला..
त्रास देणार नाही, ग आई तुला..
कात तू, मार तू
कात तू, मार तू; मी तुझा लाडका
आई चेहरा तुझा विठ्ठलासारखा..
तुझ्या प्रेमात पडलो, सारखा सारखा
आई चेहरा तुझा विठ्ठलासारखा..”

सुमधुर आवाजात तरुण हे गाणं तो. त्याचं हे गाणं त्याची आई सुद्धा ऐकते. काही लोकांना त्याचं गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटू शकते. तरुणाने आईची तुलना थेट विठ्ठलाशी म्हणजेच देवाशी केली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Mumbai Local Accident : डेक्कन क्वीनच्या प्रवाशांना बघण्याच्या नादात लोकलमधून पडला, खांबाला धडकला अन्…; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल!

युजर्सच्या प्रतिक्रिया

marathi.chhava या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई.. दोन ओळी तुझ्यासाठी ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा” तर एका युजरने लिहिलेय, “आई म्हणजे सर्वस्व” आणखी एक युजर लिहितो, “खूप छान” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.