Viral Video : सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. मेट्रोमध्ये कधी कोणी भांडताना दिसतात तर कधी कोणी रील बनवताना दिसतात, कधी जोडपे एकमेकांना किस करताना दिसतात तर कधी कोणी गोड गाणी म्हणताना दिसतात.

सध्या असाच एक आगळा वेगळा मेट्रोतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण दिल्ली मेट्रोमध्ये शिव तांडव स्तोत्र गाताना दिसत आहे. तरुणाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तरुणाने दिल्ली मेट्रोमध्ये गायले शिव तांडव स्तोत्र

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत आहे. मेट्रोमध्ये इतर प्रवासी सुद्धा आहेत. या तरुणाच्या हातात गिटार सुद्धा आहे. हा तरुण अचानकपणे गिटार वाजवत शिव तांडव स्तोत्र गाताना दिसतो. त्याला शिव तांडव स्तोत्र गाताना पाहून प्रवासी त्याच्याकडे वळून बघतात. हा तरुण अतिशय सुंदरपणे हे शिव तांडव स्तोत्र गाताना दिसतो. या व्हिडीओवर लिहिलेय, “जेव्हा मी दिल्ली मेट्रोमध्ये शिव तांडव स्त्रोत गायले..” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवल्यावर काय होतं? KBC स्टाईलमध्ये रिक्षा चालकाने विचारला प्रश्न; पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: काय वाटलं असेल त्या आईला? नीट श्वासही नाही घेतला अन् मरण दिसलं! हरणानं पिल्लाला जन्म देताच बिबट्या घेऊन गेला

sursaaz_jammers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये पहिल्यांदा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर गिटार वाजवले.” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” आणखी एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात कला” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ तुझ्या आत्मविश्वासाला तोड नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी कमेंट्समध्ये ‘हर हर महादेव’ लिहिलेय. काही युजर्सनी महिलांच्या डब्यात जाऊन गायल्याने टीका सुद्धा केली आहे. एका युजरने लिहिलेय, “महिलांच्या डब्यामध्ये जाऊन गाण्याची काय गरज होती?” तर एका युजरने लिहिलेय, “महिलांसमोर का गातात, मला हेच कळत नाही”

Story img Loader