Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ खूप प्रेरणादायी असतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा आपण भावुक होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण वडीलांचे महत्त्व सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडील हे खूप महत्त्वाचे असतात. अनेकदा आपण आईविषयी प्रेम व्यक्त करतो, तिचा गोडवा गातो. तिच्यावर आधारीत कविता लेख वाचतो पण वडीलांविषयी फार बोलले जात नाही. पण या व्हिडीओमध्ये वडीलांविषयी एक तरुण बोलताना दिसत आहे.
तरुण सांगतो, “बाप समजायला ना थोडा वेळच लागतो. बापाला समजून घेणे थोडे अवघड आहे ना.. जो बाप आपल्याला तरुणपणात सांगतो बाबा हे करू नको ते करू नको, शिस्तीत राहा ,अभ्यासावर फोकस कर तेव्हा आपल्याला बाप दुश्मन वाटतो. मोठा झाल्यावर कळते की बापच हिंतचिंतक आणि मित्र असतो. करिअर केल्यावर घर सोडतो बाहेरच्या गावात जातो करिअर करतो पहिला पगार हातात घेतो. पहिला पगार हातात आला की आपण सगळ्यांचा खर्च भागवतो. खर्च भागवता भागवता कळतं की मला काहीच राहिलं नाही. मग प्रश्न पडतो की माझ्या वडिलांनी एवढ्याशा पैशात मॅनेज कसं केलं. सगळे खर्च कसे भागवले. घर सोडलं लांब गेलो, दिवाळी आली, उत्साहात सर्वांसाठी कपडे घेतले. सर्वांना काही ना काही घेतलं मला घ्यायची वेळ आली तेव्हा मी थोडा मागे सरकलो. मग प्रश्न पडला की पप्पांसारखाच होतोय. पप्पांनी कुठं काय स्वत:ला घेतलं. घर सोडलं की बाप कळतो. लहापपणी वाटायचं पप्पा शांत शांत का वाटतो. पप्पा हसत का नाही? दुकानातून आला, जॉबवरून आला की पप्पा शांत का बसतो?मोठं झाल्यावर त्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. ज्या सफरींग मधून ज्या दु:खा मधून, ज्या सर्व गोष्टींमधून तुम्ही आता जाताहेत, त्या गोष्टींमधूनच दहा पटीने तुमचा बाप गेला आहे. पप्पा कधी व्यक्त झाला नाही तो फक्त हसत राहिला आणि चालायचा. आणि बाप चालायचा म्हणून घर चालत राहिलं बाप कधी व्यक्त होत नाही फक्त हसतो आणि फक्त शांत बसतो. मोठं व्हाल तसा बाप समजतो. बाप समजायला थोडा वेळ लागतो.”
हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “भाऊ डोळ्यातून पाणी आलं रे”

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?

हेही वाचा : VIDEO: “जेव्हा कर्माचे फळ लगेच मिळते” पेट्रालचे पैसे न देता पळून जात होता कारचालक इतक्यात डाव पलटला; नेमकं काय घडलं?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

royal__editx या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वडील”

हेही वाचा : “जबाबदारी माणसाला वयाच्या आधीच मोठं करते”, भरउन्हात कष्ट करणाऱ्या लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून डोळे पाणावतील

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ जे बोललास तेच अनुभवतोय मी आता” तर एका युजरने लिहिलेय, “देवमाणुस” आणखी एका युजरने लिहिलेय, “जीवनातील राजा माणूस वडील” एक युजर लिहितो, “बाप बाप असतो त्याची जागा कोणी नाही घेऊ शकेल” तर एक युजर लिहितो, “खरंच बापाला समजायला वेळ लागतो”

Story img Loader