Viral video : आजकाल नवीन भाषा शिकण्यासाठी अनेक अभ्यासक्रम किंवा नवीन मार्ग सोशल मीडियावरसुद्धा उपलब्ध आहेत. नवनवीन भाषा शिकणे आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे अनेकांना कठीण जाते; पण काही जण यात मास्टर असतात. ते एकाचवेळी अनेक भाषांमध्ये संवाद साधण्याच्या कौशल्याने अनेकांना चकित करतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. जपानमध्ये राहणारी एक भारतीय तरुणी सहा भाषांमध्ये संवाद साधताना दिसून आली.
सुरुवातीला तरुणी व्हिडीओत स्वतःची ओळख करून देते. ओळख करून देताना सगळ्यात आधी तरुणी हिंदी आणि बंगाली भाषेत संवाद साधते. त्यानंतर आसामी, कोरियन, जपानी आणि सगळ्यात शेवटी इंग्रजी भाषेत संवाद साधताना दिसून येते. काही सेकंदात तरुणी सहा भाषांमध्ये संवाद साधून तिचे कौशल्य व्हिडीओत दाखवते. स्वतःची ओळख तरुणी सहा भाषांमध्ये करून देते. जपानी तरुणीने कशाप्रकारे सहा भाषांमधून संवाद साधला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा… लक्षात ठेवा! डाव कधीही पलटू शकतो; ‘हा’ VIDEO पाहून कळेल ‘संयम’ का महत्वाचा आहे…
व्हिडीओ नक्की बघा :
एकाचवेळी सहा भाषांमध्ये साधला संवाद :
आपल्यातील अनेकांना विविध भाषा शिकण्याची आवड असते. अनेक जण या भाषांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तसेच भाषा शिकण्यासाठी क्लास किंवा कोर्स करतात. पण, या व्हिडीओत तरुणी अगदी सहजरित्या सहा भाषा काही सेकंदात बोलताना दिसते आहे. जपानची रहिवासी असणारी तरुणी सहा भाषांमध्ये संवाद साधताना दिसून आली आहे. सगळ्यात पहिले तरुणी स्वतःची ओळख करून देते. तरुणीचे नाव ‘क्रिती’ असे आहे. तसेच तरुणी भारतीय असून मुळची बंगालची आहे, असे तिने व्हिडीओच्या सुरुवातीला नमूद केले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तरुणीच्या @krilovee._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला ‘बहुभाषिक भारतीय मुलगी’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडीओ पाहणारे अनेक जण तरुणीचे कौशल्य पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत; तर काही जण तरुणीचे बंगाली भाषेतील संवाद ऐकून तिची प्रशंसा करताना दिसून आले आहेत. आसाममधूनदेखील तरुणीवर प्रेमाचा वर्षाव होताना कमेंटमध्ये दिसून येत आहे.