Viral Video : आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील ती माणसं आहेत ज्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. आयुष्यभर ते लेकरांच्या सुखासाठी धडपडत असतात. मुलांची स्वप्ने पूर्ण व्हावी, यासाठी देवाजवळ प्रार्थना करतात पण अनेकदा आपण आई वडीलांच्या स्वप्नांचा विचार करत नाही. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हा तरुण हयात नसलेल्या त्याच्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करताना दिसतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. त्याच्या वडिलांचे एक स्वप्न होते की त्यांच्याजवळ एक कार असावी पण स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते जग सोडून गेले. पण वडिल गेल्यानंतर मुलाने त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि खरेदी केली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण त्याच्या आईला कार खरेदी करण्यासाठी घेऊन जातो. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. जेव्हा आई कारमध्ये बसते तेव्हा आईचे अश्रु अनावर होतात आणि आई ढसा ढसा रडताना दिसते. शेवटी भावूक झालेली आई मुलाचे आभार मानते आणि त्याचे अभिनंदन करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कुस्तीचा असा डाव कधीच पाहिला नसेल; अवघ्या ४० सेकंदात धोबीपछाड, बेळगावमधल्या जंगी कुस्तीचा Video Viral

पाहा व्हायरल व्हिडीओ

nileshkotadiya_ या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय, “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की आपल्याकडे एक कार असावी पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यावेळी माझ्या आईने कुटुंबाला जुळवून ठेवले आणि प्रत्येक समस्यांचा धैर्याने सामना केला. त्यावेळी मी ठरवले की बाबांचे स्वप्न पूर्ण करणार.
आज ८ वर्षानंतर मी माझ्या आईला सरप्राइज दिले. तिचे चेहऱ्यावरील भाव माझ्यासाठी अमूल्य होते. तिचे डोळे अश्रुंनी भरले होते. तिने कधी विचारही केला नसेल की एकदिवस तिचा मुलगा स्वप्न पूर्ण करेन. “

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “फक्त कार नाही तर आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणे यापेक्षा कोणतीच गोष्ट खास नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “भावा तु आयुष्य जिंकलास” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक मध्यमवर्गीय मुलगा हे स्वप्न पाहत असतो” अनेक युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहेत.