Viral Video : प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा ते एकमेकांसाठी वाट्टेल ते करतात. कधी भांडतात, तर कधी एकमेकांची जीवापाड काळजी करतात. हे नातं इतकं घट्ट असतं की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण नवीन खरेदी केलेल्या कारमध्ये पहिल्या सीटवर प्रेयसीचा फोटो आणि पुष्पगुच्छ ठेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही वाटेल नेमकं प्रकरण काय? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a young man cried in front of girlfriends photo putted in new car video goes viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने कार खरेदी केली आहे आणि गाडीच्या पुढील सीटवर तो प्रेयसीचा फोटो ठेवताना दिसत आहे. त्यानंतर त्या फोटोसमोर तो पुष्पगुच्छ ठेवतो आणि सीटवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडताना दिसतो. त्यानंतर त्याचे मित्र येतात आणि त्याला जागेवरून उठवतात पण तरीसुद्धा तरुणाचे अश्रु थांबत नाही. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
marathi_memer_2.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आणि लोक म्हणतात पुरुषाचं प्रेम खरं नसतं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या व्हिडिओने मला खूप रडवले.” तर एका युजरने लिहिलेय, “आवडती व्यक्ती जेव्हा अशी सोडून जाते खूप खूप दुःख होतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “प्रेम नाही आठवणी रडवतात” एक युजर लिहितो, “डोळे भरून आले भावा, प्रेम असावे तर असं” तर एक युजर लिहितो, “हा व्हिडिओ पाहून मी खूप रडले, प्रेम हे असे पण असते” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.