Viral Video : नुकतेच अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लांच्या मू्र्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. य निमित्त्याने देशात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली. सोशल मीडियावर सुद्धा श्रीरामाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अनेक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने रामाविषयी प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर काही लोक रामाच्या रांगोळ्या काढताना दिसत आहे तर कोणी रामाचे गीत गाताना दिसत आहे. काही लोक रामाच्या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे तर काही लोक श्रीरामावर कविता सादर करताना दिसत आहे. अशातच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्वस्तिक’पासून श्रीरामाचे सुंदर चित्र काढताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोक त्याच्या कलेवर भारावून जाईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण काळ्या बोर्डवर पांढऱ्या खडूनी स्वस्तिक काढताना दिसत आहे. सुरुवातीला स्वस्तिक पाहून कोणालाही वाटणार नाही की या स्वस्तिकपासून श्रीरामाचे चित्र काढता येईल. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की अत्यंत कलात्मकरित्या हा तरुण स्वस्तिकपासून श्रीरामाचे चित्र काढताना दिसतो. गुडघ्यावर बसून श्रीराम धनुष्य बाण चालवताना या चित्रात दिसत आहे. चित्र काढल्यानंतर हा तरुण चित्राच्या वर श्री राम असे लिहितो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चित्रातून तुम्हाला या तरुणाचे श्रीरामाविषयीचे प्रेम दिसून येईल.
naresh_fouji_art या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्वस्तिक चिन्हापासून खूप सोप्या पद्धतीने श्रीरामाचे चित्र काढायला शिका” हे अकाउंट एका जवानाचे आहे. जवानाने हे सुंदर चित्र काढले आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह! खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर चित्र रेखाटले आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ‘जय श्री राम’ लिहिलेय.