सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी सध्याची तरुणाई अनेक वेगवेगळ्या प्रकारची रील्स तयार करत असते. अनेकदा इतरांपेक्षा वेगळं रील तयार करण्यासाठी अनेकजण भलतं धाडस करतात. शिवाय रील करण्याच्या नादात अनेकांना मोठ्या अपघातांचा सामना करावा लागल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अशातच आता रील करण्याच्या नादात एका तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बस्ती येथील सोनहा पोलीस स्टेशनच्या परिसरात राहणारे ३ तरूण रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करायचे. शिवाय ते अनेक थरारक रील्स बनवण्यासाठी नदीत वेगवेगळे स्टंट करायचे, याच स्टंटच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कारण रील करताना तिघेजण नदीत बुडाले, यावेळी रील शूट करत असलेल्या तरुणाने तिघांपैकी २ मित्रांना नदीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र तिसऱ्या तरुणाला वाचवता आलं नाही.

Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
father tried to do obscenity in front of his minor daughter by getting naked
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीसमोर नग्न होणाऱ्या वडिलांना अटक
man in pune entered house of elderly woman and tried to kill her
पुणे : धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, गजबलेल्या गणेश पेठेतील घटना; आरोपी अटकेत
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
Rape on Finance News
Rape on Finance : लग्न ठरलेल्या पत्नीवर होणाऱ्या पतीने केला जनावराप्रमाणे चावे घेऊन बलात्कार, त्यानंतर मित्रांकडे सोपवलं आणि..

हेही पाहा- उन्हापासून बचाव, इंधनाचीही बचत; तरुणाने भंगारापासून बनवलेल्या जुगाडू बाईकची उद्योगपतींनाही पडली भुरळ, पाहा Video

ही घटना सोनही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुआनो नदीचा बाढू घाट येथे घडली आहे. रील बनवणाऱ्या तरुणाने दुसऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने पाण्यात बुडणाऱ्या २ मित्रांना वाचवले मात्र एकाला वाचवण्यात अपयश आलं. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी सोना पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या नदीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

हेही पाहा- “तो आता जिवंत…” भररस्त्यात बायकोने नवऱ्याला मुलीबरोबर नाचताना पाहिलं अन्…, Video पाहून पोट धरुन हसाल

सदुल्लापूर येथे राहणारा घनश्याम मौर्य हा तरुण सलीम, अरबाज आणि अब्दुल्लाहसह घराबाहेर पडला. रील बनवण्याच्या तो सकाळी आपल्या गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या नदीवर गेला. घनश्याम, अरबाज आणि अब्दुलाह यांनी नदीत उडी मारली, त्यावेळी सलीम मोबाईलद्वारे व्हिडिओ बनवत होता. नदीत उडी मारलेले तिघेही अचानक नदीत बुडताना पाहून सलीमने नदीत उडी मारली आणि अरबाज आणि अब्दुल्ला यांना आणखी एका व्यक्तीच्या मदतीने वाचवले. मात्र, घनश्याम मौर्य हा मात्र नदीत बुडाला.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपेंद्रनाथ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ तरुण व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने नदीवर गेले होते. त्यापैकी एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.