मनोरंजक आणि अविश्वसनीय विक्रम नोंदवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलेल्या लोकांच्या कथा थक्क करतात. असाच एक रेकॉर्ड आहे जो तुम्हाला चकित करेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इन्स्टाग्राम पेज अनेकदा आयुष्याच्या काही टप्प्यांवर इतिहास घडवणाऱ्या लोकांचे थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट करत असतात. हा व्हिडीओ २०१५ चा आहे. जो काही तासांपूर्वी पोस्ट केला आहे. यात जगतीश मणी नावाचा एक माणूस २.२ किलोमीटर अंतरासाठी आपली तीन चाकी दोन चाकांवर चालवत असल्याचे दिसत आहे.
“एपिक ऑटो-रिक्षा साईड व्हीली. चेन्नई येथील ऑटो रिक्षाचालक जगथीश एम यांनी भारतीय टुक टुक (रिक्षा) बाजूने चालवत रेकॉर्ड केला” कॅप्शन लिहले आहे. ” मी समाधानी आहे ” जगतीश मणीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसला सांगितले.
व्हिडीओ, शेअर केल्यापासून, तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत. “फक्त भारतीयच हे करू शकतात,” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “मला एक सवारी करायची आहे,” दुसऱ्याने हसणाऱ्या इमोटिकॉनसह कमेंट केली . “हे खूप न आहे,” अजून एका वापरकर्त्याने कमेंट केली.