Viral Video : नुकतेच अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक भक्त रामाविषयी वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत आदरांजली वाहताना दिसत आहे. अशातच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या तरुणाला दोन्ही हात नाही तरीसुद्धा तो अप्रतिम असे रामलल्लांचे चित्र रेखाटताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन्ही हात नसलेला दिव्यांग तरुण दिसेल. तो व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे अप्रतिम सुंदर असे रामलल्लांच्या मूर्तीचे चित्र काढताना दिसत आहे. तो अतिशय सुरेख असे चित्र काढताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. या जगाच अशक्य काहीच नाही. जर तुम्ही मनात एखादी गोष्ट ठरवली आणि त्यासाठी मेहनत घेतली तर तुम्ही नक्की यशस्वी होता. या व्हिडीओमध्ये सुद्धा हा तरुण अशक्य असलेली गोष्ट प्रबळ इच्छाशक्तीमुळे शक्य करून दाखवत आहे.
मूर्तीचे हुबेहूब चित्र काढताना तो दिसतोय.त्याचे चित्र पाहून तुम्हीही या तरुणाचे चाहते व्हाल. युजर्सना सुद्धा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझ्याकडे शब्द नाही” तर एका युजरने लिहिलेय, “तुझा हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला. अप्रतिम दादा” आणखी एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ‘जय श्री राम’ असे लिहिले आहे.
हेही वाचा : Optical Illusion : या फोटोमध्ये लपलाय बेडूक, ९९ टक्के लोकांना दिसणार नाही; तुम्हाला दिसतोय का?
uniquedhavalkhatri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिलेय, “खूप मनापासून हे चित्र रेखाटत आहे त्यामुळे वेळ लागत आहे. जय श्री राम” धवल खत्री असे या तरुणाचे नाव आहे. त्याने त्याच्या या अकाउंटवर असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकतेच त्याने रश्मिका मंदाना आणि सोनू सूदचे चित्र काढून त्यांना भेट म्हणून दिले होते.