Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते, तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. काही व्हिडीओ खूप काही शिकवून जातात तर काही व्हिडीओ पाहून जगण्यास प्रेरणा मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चहाच्या टपरीवर विचार करत बसलेल्या निराश तरुणाबरोबर असे काही घडते की पुढच्या काही क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की या तरुणाबरोबर नेमके काय घडते? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण चहाच्या टपरीवर खूप विचार करत बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरून कळते की तो खूप टेन्शनमध्ये आहे. त्यानंतर अचानक एक तरुण त्याच्याजवळ येतो आणि त्याच्या हातात चिठ्ठी देतो आणि तिथून निघून जातो. त्या चिठ्ठीवर जे लिहिले असते ते वाचून टेन्शनमध्ये असलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर अलगद हसू येते. तो इकडे तिकडे पाहतो आणि त्या चिठ्ठीचा फोटो काढतो. त्यानंतर तो खिशातून त्याचे पाकीट काढतो आणि ती चिठ्ठी पाकीटात ठेवतो.
काय होतं चिठ्ठीमध्ये?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या चिठ्ठीवर नेमके काय लिहिले होते? त्या चिठ्ठीवर हिन्दीमध्ये लिहिले होते, “ज्यादा मत सोच मेरे भाई. वक्त बुरा है, हालात नही. ये वक्त भी गुजर जायेगा बस हिम्मत मत हारना”
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांच्या अंगावर काटा येईल तर काही लोकांना हा व्हिडीओ पाहून एक नवीन ऊर्जा मिळेल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
prank_maza_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “व्हिडिओ पाहून कसा वाटला आणि हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीला शेअर करा, ज्यांना या व्हिडिओ ची किंमत कळाली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रँक करावं तर आसा करावं , एखाद्याच जीवन बदलून जाईल. फ्री मध्ये औषध हा सोशल मीडिया चा खरा अर्थ आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी भावांनो…….काही क्षणांत त्याचे हावभाव बदलले ते पण एका ओळीमध्ये आणि हे फक्त तुम्हीच करू शकता” एक युजर लिहितो, “सोशल मीडियावरील योग्य तो व्हिडिओ हाच…”