Viral Video : खजिन्याचा शोध हा खेळ तुम्ही अनेकदा लहानपणी खेळला असाल. या खेळामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद वस्तू लवपलेली असते आणि आपल्याला ती शोधायची असते पण तुम्ही कधी ऑनलाईन हा खेळ खेळला आहात का? तुम्हाला प्रश्न पडेल की ऑनलाईन हा खेळ कसा खेळणार? दिल्लीचा एक तरुण सोशल मीडियावर सध्या हा खेळ खेळतोय. तुम्हाला वाटेल सोशल मीडिया कोणी खजिना कसा शोधणार, तर त्यासाठी तुम्हाला सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहावा लागेल. हा तरुण दिल्लीत कुठेही एका ठिकाणी ५०० रुपयांची नोट लपवतो. तो परिसर दाखवतो आणि ती ५०० रुपयांची नोट यूजर्सना शोधायला लावतो. सध्या या तरुणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला एक तरुण पाचशे रुपयांची नोट फोल्ड करुन एका ठिकाणी लपवताना दिसत आहे. त्यानंतर तो सुंदर तलावाचे दृश्य दाखवतो. तलावाच्या अवती भोवतीचा परिसर दाखवतो. व्हिडीओवर लिहितो, “जागा शोधा आणि पैसे घेऊन जा”
treasurehunt_delhi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नॉर्थ दिल्लीमध्ये बोटिंग करायला या”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नैनी तलाव आहे. मी यायला पाहिजे होता.” तर एका युजरने लिहिलेय, “नोएडा सेक्टर ६३ मध्ये या आणि पैसे लपवा” आणखी एका युजरने लिहिलेय, “लक्ष्मी नगर कडे पण कधी पैसे ठेवा”
हेही वाचा : VIDEO : बापरे! भेंडी समोसा; तुम्ही कधी खाल्ला का? व्हिडीओ होतोय व्हायरल
कोण आहे हा तरुण?
दिल्लीच्या एका तरुणाने सोशल मीडियावर treasurehunt_delhi नावाचे अकाउंट उघडले असून तो दिल्लीच्या विविध भागांमध्ये ५०० रुपयांची नोट लपवत असतो आणि परिसर दाखवून लोकांना ठिकाण शोधण्यास सांगतो. त्याच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला दिसेल की त्याने अनेक ठिकाणी पैसे लपवले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देतात. त्याचे १४ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. लोक आवडीने त्याचे व्हिडीओ पाहतात.