‘पुणे तिथे काय उणे’ असं आपण नेहमी म्हणत असतो. कारण इथल्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी वैविध्य आढळत, मग ती लोकांना एखादी गोष्ट समजावून सांगण्याची असो वा प्राण्यांना, पुण्याची भाषा नेहमीच खास असते. सध्या पुण्यात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा असाच गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या मागून येणाऱ्या कुत्र्याला थांबवण्यासाठी चक्क बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या आवाजाची मिमिक्री करताना दिसतं आहे.

सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण या तरुणाची कुत्र्याला थांबवण्याची पद्धत बघाल तर तुम्हाला हसू आवरणार नाही. कारण, बहुतांश लोकं कुत्रा पाठलाग करायला लागल्यावर त्याला दगड मारतात, मोठ्याने ओरडतात, नाहीतर शेवटी त्याला काठीने मारण्याचा प्रयत्न करतात.

Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video

हेही पाहा- नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video

पण या तरुणाने कुत्र्याला कसलीही मारहाण न करता, बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या आवाजात तो कुत्र्याला ‘माझा पाठलाग करु नको’ असं सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओतील तरुण त्याच्या काही मित्रांसह पुणे विद्यापीठात रात्रीच्या वेळी फिरायला गेला असता त्यांच्या मागून एक कुत्रा येतो. त्यावेळी सध्याच्या रील्सच्या ट्रेंडनुसार ते एक व्हिडीओ शूट करतात. ज्यामध्ये एक तरुण आपला पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला ‘माझ्या मागे येऊ नको’ हे सांगण्यासाठी सनी देओलच्या आवाजाची आणि चित्रपटातील संवादांची मिमिक्री करताना दिसत आहे.

हा तरुण पाठलाग करणाऱ्या कुत्र्याला तो म्हणतो, “अरे! ओये पीछे मत आ, ओये,” असं म्हणतो. त्याच्या बोलण्याच्या अंदाजामुळे त्याचा व्हिडीओ शूट करणाऱ्याला देखील त्याचं हसू आवरता येत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. तो पुढे म्हणतो “ओये रुक जा… ओ पीछे मत आ, मार दुंगा कसम गंगा मैया की,” असं तो त्या कुत्र्याला म्हणताना दिसतं आहे. व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ aazadaakash_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. कारण, आत्तापर्यंत जवळपास १. ४ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर लाखो लोकांनी लाइक केला आहे. काही नेटकरी ‘हा तर सनी देओलचा डुप्लिकेट आहे’ असं ते म्हणत आहेत. शिवाय अनेकांनी या व्हिडीओच्या खाली हसण्याच्या इमोजी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी ‘भावा आता तु खूप फेमस झाला आहेस’ असंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader