Viral video: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बांधकाम करत असलेल्या एका मजुरासोबत भयंकर अपघात घडला आहे. या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्षात हा मजूर घराच्या बांधकामात गुंतला होता. त्यानंतर चुकून हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरच्या तो संपर्कात आला, वायरच्या संपर्कात मजूर येताच जोरदार स्फोट झाला अन् आग लागली. यामध्ये मजूराचा गळा अडकला आणि त्यालाही जोरदार झडका लागला. हा विजेचा धक्का इतका मोठा होता की मजूराला वाचवण्यासाठी संधीही मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामगाराचा भयंकर शेवट

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अपघाताची संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये हा मजूर हाय टेंशन इलेक्ट्रिक वायरमध्ये अडकलेला दिसत आहे. तुम्ही व्हिडिओ नीट पाहिल्यावर, तुम्हाला दिसेल की कामगाराची मान वायरमध्ये अडकली होती, ज्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि तो वायरला अडकून राहिला. त्याचा पाय घसरल्याचे बोलले जात आहे. यामुळे तो हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला.

शीर धडापासून झाले वेगळे

हा मजूर काही मिनिटे वायरला तसाच चिटकून होता, त्याचे अर्धे शरीर बांधकाम सुरू असलेल्या छतावर होते तर उर्वरित अर्धे शरीर हाय टेंशन वायरला चिकटल्यामुळे हवेत लटकले होते. विजेचा धक्का लागून मजुराचा जागीच मृत्यू झाला. काही वेळ कामगार तारेला चिकटून राहिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो थेट जमिनीवर पडला. धक्कादायक बाब म्हणजे ती व्यक्ती जमिनीवर पडली तेव्हा त्याचे डोके शरीरापासून वेगळे झाले.

हेही वाचा >> VIDEO: पालकांनो लेकरांना सांभाळा! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग…

मजुराच्या वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दरम्यान, भयानक असल्याने, आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. या घटनेवर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की, ‘प्रत्येक गल्ली, रस्ता आणि परिसरात अशा लटकलेल्या तारा सापडतील, ज्यामुळे मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळते.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘ही बिल्डरची चूक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man in kanpurs kalyanpur police station area died of an electric shock due to the negligence of the electricity department video viral srk